Breaking News

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहर कार्यकारी समितीची बैठक

पनवेल : वार्ताहर

केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारी समितीची बैठक नुकतीच मंगळवारी (दि. 21) उपायुक्त कैलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी, राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियानाचे प्रतिनिधी आरोग्य विभाग महापालिका प्रतिनिधी, वस्तीस्तर संघाचे प्रतिनिधी व एनयुएलएमचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत अभियानांतर्गत दारिद्य्र रेषेखालील लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त बचतगट तयार करणे व त्यांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्यावर चर्चा करण्यात आली, तसेच पथविक्रेत्यांकरिता प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देताना बँकाशी संबधित येणार्‍या अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी पुढाकार घेण्याबाबत उपायुक्त कैलास गावडे यांनी यावेळी सूचित केले. प्रधानमंत्री स्वनिधी व स्वयंरोजगार अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरीत करण्यासाठी देखील बँकांनी सहकार्य करावे, असे उपायुक्तांनी सांगितले, तसेच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत महानगरपालिका असंघटीत क्षेत्रात काम करणार्‍या वय वर्ष 18 ते 40 असणार्‍या कामगारांची, बचत गटांतील सदस्यांची नोंदणी पीएमएसवायएम पोर्टलवर नोंदणी करणेबाबत उपायुक्त विठ्ठल डाके यांनी संबंधित विभागास सूचित केले.

दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अमंलबजावणीकरिता सर्वतोपरी मदत करण्याचे यावेळी बँकानी आश्वासन दिले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply