Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी

महाड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी (दि. 22) दुपारी रसायन वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टँकरमधील  रसायन रस्त्याकडेला सांडून नुकसान झाले आहे. लोटे औद्योगिक क्षेत्रांमधील विनाती ऑर्गानिक या कंपनीतून रसायन घेऊन मुंबई दिशेने जाणार्‍या टँकरला बुधवारी मोहरे येथील वळणावर अपघात झाला. त्यामुळे टँकरमधून गळती होऊन रसायन रस्त्याकडेला गटारात गेले. सुरुवातीला हे रसायन ज्वालाग्राही आहे अगर नाही याबाबत माहिती नसल्याने जमलेल्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र सदर रसायन ज्वालाग्राही नसल्याचे स्पष्ट होताच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेचे वृत्त समजताच महामार्ग वाहतूक पोलीस, महाड शहर व तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त टँकर सुरक्षितरित्या उचलण्यासाठी संबंधीत यंत्रणेला पाचारण केले.

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply