Breaking News

पनवेलमध्ये पथविक्रेत्यांना भांडवली सहाय्य

 प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेतर्फे मदत

पनवेल : प्रतिनिधी

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत  महापालिकेच्या वतीने 10 हजारांचे पथविक्रत्यांना भांडवल सहाय्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे, डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 10 हजारांचे प्रथम कर्ज वेळेत परतफेड केल्यानंतर 20 हजारांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

नगरपथविक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. नगरवासीयांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात ते महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कोविड- 19च्या काळात टाळेबंदीमध्ये  पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसायास खेळत्या भांडवलांचा पतपुरवठा तातडीने करण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी www.pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर संपर्क करावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे

पनवेल महानगरपालिका कार्यालयात  डेनयुलएम विभागाच्या विनया म्हात्रे (8097044844), नवनाथ थोरात (9850725584) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.

लाभार्थी पात्रता निकष

दिनांक 24 मार्च 2020 रोजी व त्यापूर्वीचे पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र अथवा ओळखपत्र असलेले पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळलेले, परंतु त्यांना विक्री प्रमाणापत्र /ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरू केली आहे आणि त्यास नागरी संस्थांनी किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे. आसपासच्या विकास अथवा पेरी-शहरी अथवा ग्रामीण भागातील पथविक्रेते नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यास नागरी संस्थेने किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केलेले आहे.

लाभाचा तपशील

नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मुदतीस 10 हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास आणि त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. या कर्जावर आरबीआय च्या प्रचलित दराप्रमाणे व्याज दर लागू राहतील. विहीत कालावधी मध्ये कर्ज परतफेड केल्यास सात टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र.

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड, बँक पासबुक, रेशनकार्ड, बाजार फी वसुली पावती, आधारलिंक मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply