Breaking News

विधानसभा उपाध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही

दोन अपक्ष आमदारांचा दावा

मुंबई ः प्रतिनिधी
एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर आली होती. 12 आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाईच्या वृत्तांनंतर उपाध्यक्षांना तो अधिकारच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या संदर्भात दोन अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी उपाध्यक्षांना पत्र दिले आहे. एकनाथ शिंदे गटाने दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दाखल केला आहे. विधानसभा नियमान्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी 2016च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखल पत्रात दिला आहे. एखाद्या विधानसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांविरोधात जर अविश्वास प्रस्ताव आणला असेल तर त्यांना सदस्यांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे या पत्रात नमूद केले आहे. त्याआधी अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना हा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा लागतो आणि त्यानंतरच त्यांना सदस्यांच्या अपात्रतेविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. विधानसभा नियमान्वये विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला असून त्यांना आता आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेता येणार नाही, असे या पत्रात म्हटले आहे. आता ही बाब न्यायालयात जाण्याची शक्यता असून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply