Breaking News

पनवेल मनपाकडून खारघरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पनवेल : वार्ताहर

खारघरमधील सेक्टर 34, 35, 36, 37मध्ये शुक्रवारी (दि. 24) अनधिकृत ढाबे, गाड्या सर्व्हिसींग दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने यांच्यावरती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. दुपारी 4 वाजेपर्यंत चार भंगार दुकाने, एक गाडी सर्व्हिसिंग दुकान, पाच झोपड्या, तीन ढाबे अशी एकुण 13 अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.

खारघरमध्ये अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांमध्ये प्रामुख्याने ढाबे, सर्व्हिसिंग दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने या सर्वांवरती आयुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर खारघर प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने उपायुक्त कैलास गावडे यांच्या सूचनेनूसार प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साह्याने या अनधिकृत व्यावसायिकांवरती कारवाई करून, अतिक्रमणे जमीनदोस्त केली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply