Breaking News

‘महाराष्ट्रात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार’

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. महाराष्ट्रात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास ना. एकनाथ शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना आमदार केसरकर पुढे म्हणाले की, सध्या 10-12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. आमच्यावर गद्दाराचे आरोप करण्यात आले आहेत. हे कितपत योग्य आहे? बाहेर पडणार्‍यांची समजूत काढण्याची पद्धत आहे, मात्र इथे समजूत काढताना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ सोडावी. आमदार केसरकर यांनी या वेळी एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचेही स्पष्ट केले.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply