Breaking News

भाजप नगरसेवकांच्या कामाचे श्रेय लाटण्याचा शेकापचा प्रयत्न

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका हद्दीतील भाजपच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून केलेल्या कामांचे श्रेय मिळवण्यासाठी शेकापकडून  पूर्वीच झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. आपला निधी कोठे वापरता येतो याबाबतचे शेकापच्या नगरसेविकेचे अज्ञान यानिमित्ताने उघड झाले असल्याचे भाजपचे प्रवक्ते नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी म्हटले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामाचा शुभारंभ माजी आणि आजी आमदारांच्या हस्ते करण्याचा घाट शेकापतर्फे घालण्यात आला. महापालिकेच्या प्रभाग 9मधील ही कामे शेकाप नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे होत असल्याचे सांगण्याचा हा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये दाखवण्यात आलेली कामे प्रत्यक्षात भाजप नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे झालेली आहेत. टेंभोडे गणेश विसर्जन घाट हा सप्टेंबरमध्ये गणेश उत्सवापूर्वीच पूर्ण झाला होता. त्या ठिकाणी या वर्षी सहा महिन्यांपूर्वी लोकांनी गणेश विसर्जनही केले. असे असताना या घाटाचे पुन्हा उद्घाटन करून आम्हीच काम केले दाखवण्याचा निंदनीय प्रयत्न केला जात आहे.

टेंभोडे स्ट्रीट लाईटसाठी भाजपचे नगरसेवक महादेव मधे यांनी 28 सप्टेंबर 2017 रोजी पत्र दिले होते. हे कामही आम्हीच केले असे दाखवण्यासाठी त्या कामाचाही उद्घाटनामध्ये शेकापने समावेश केला आहे. नगरसेवक निधीची प्रत्येकी दोन-दोन कामे एकूण तीन लाख रुपयांची केली असताना भाजपच्या नगरसेवकांनी केलेली कामे आपणच केली असे दाखवताना प्रभाग समिती अध्यक्ष असलेले भाजपचे नगरसेवक एकनाथ गायकवाड आणि नगरसेवक महादेव मधे यांना न विचारताच त्यांची नावे या निमंत्रण पत्रिकेत छापण्यात आली असल्याचे सांगून प्रकाश बिनेदार यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल खोटे बोलणार्‍यांना गणपती बाप्पा शिक्षा

करेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Check Also

लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता …

Leave a Reply