पनवेल : रामप्रहर वृत्त
आयत्या पिठावर रांगोळ्या काढण्याचा केविलवाना प्रयत्न काम शेतकरी कागार पक्ष करीत असल्याची टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी विकास कामाच्या भूमिपूजनावेळी केली. प्रभाग क्रमांक 9, सेक्टर 5 आसूडगाव येथील गार्डनचे सुशोभिकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चंद्रकला शेळके यांनी पाठपुरावा केला असून या कामाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 29) भूमिपूजन झाले.
पनवेल महापालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी परिसरात उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चंद्रकला शेळके यांच्या सातत्यपुूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 9 सेक्टर 5मधील आसूडगावातील गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम मंजूर झाले आहे. या कामासाठी 95 लाखांचा निधी वापरून गार्डनमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विकासकामांच्या भूमिपूजना वेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, प्रविण पाटील, नगरसेविका चंद्रकला शेळके, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खांदाकॉलनी महिला मोर्चा अध्यक्षा राखी पिंपळे, भाजपनेते शशिकांत शेळके, गोपीनाथ मुंढे, मच्छींद्र वर्तक, दिपक जांभळे, मोतीलाल कोळी, संजय कांबळे, युवामोर्चा खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, मंगेश गायकर, रामदास गायधन, विश्वास रेडेकर, सुधिर शिंदे, मनाली गायकर, गिता रेडेकर, आशा मुंढे, मनिषा पाटील, सोनाली सावंत, सिद्धेश खानावकर, रोहित कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सर्व परिसराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आमची मतदारांशी बांधिलकी आहे, मात्र दुर्दैवाने महापालिकेतील विरोधी पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष स्वार्थासाठी महाविकास आघडीच्या नादी लागला आहे. विवेक पाटील यांनी कर्नाळा बँक बुडवली, त्याला एक वर्षाचा कालावधी लोटला तरही महाविकास आघाडी सरकारने त्यांना अटक होण्यापासून रोखले होते. याच स्वार्थापोटी शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिला. त्यामुळे भाजप जी विकासकामे करायला जाते त्याला विरोध करीत फक्त श्रेय घेण्याचे काम आत्तापर्यंत शेकापने केले आहे, अशी टीका केली, तसेच जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा भारतीय जनता पार्टी काम करेल, असे आश्वासन देऊन पाठपुरावा करून विकासकामे मंजूर करून केल्याबद्दल नगरसेवकांचा अभिनंदन केले.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …