पनवेल : प्रतिनिधी
पनवेलमधील वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. महानगरपालिका हद्दीतील पनवेल शहरातील पटेल मोहल्ला परिसरातील जुन्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिन्या ठिकाणी नविन वाहिन्या टाकणे व त्या अनुषंगाने येणारे इतर कामे करण्याच्या विषयांस स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा बुधवारी (दि. 29) मुख्यालयातील सभागृहात स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी सभागृहनेते परेश ठाकूर, जगदीश गायकवाड, प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, निलेश बावीस्कर, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहायय्क आयुक्त वैभव विधाते, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सचिव तिलकराज खापर्डे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेच्या मालकीच्या वडाळे तलावातील पाण्याचा दर्जा चांगला राहावा म्हणून नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. महानगरपालिका हद्दीत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत सन 2015-2016, 2016-2017 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या, वृक्षलागवड व लॉन या झालेल्या कामांची निगा, दुरुस्ती, देखभाल करणे, कळंबोली नोडमधील दैनिक बाजारातील दैनिक शुल्क वसूल करण्यासाठी ई-निविदेतील उच्चतम स्तरावरील निविदाकारांच्या प्रस्तावास मान्यता मिळणेबाबतचा विषय सभेत मंजूर करण्यात आला.
घनकचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी तीन टन क्षमतेच्या 10 घंटागाड्या, 14 घनमीटर क्षमतेच्या 11 घंटागाड्या, एक टन क्षमतेच्या 32 घंटागाड्या खरेदी करण्यासाठी न्युनतम दराच्या निविदेस मान्यता देणेबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली.
कळंबोली येथील 72 बेडचे कोविड समर्पित रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करण्याकरीता मनुष्यबळ पुरवठा होण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई-निविदेमधील न्युनतम स्तरावरील ठेकेदारास ठेका देण्याच्या विषयास स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …