Breaking News

माणगावात एकाच रात्रीत सहा घरे फोडली

सहा लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार

माणगाव : प्रतिनिधी

शहरातील बामणोली मार्गावर एकाच रात्रीत सहा बंद घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे पाच लाख 72 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

माणगावमधील बामणोली मार्गावरील सहा बंद घरे अज्ञात चोरट्यांनी 3 मार्च 2021 रोजी रात्री 11 ते 4 मार्च 2021 रोजी सकाळी 6.30 या वेळेत फोडली. त्यात प्रमोद कांबळे, कमलाकर बाळाराम उभारे (रामाश्रय बिल्डिंग, पहिला मजला, रूम नं.104), रामनारायण मिश्रा (रूम नं. 102 व 103), अभिजित गोडसे (रूम नं. 204) यांच्या बंद घरांच्या दरवाजांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील ऐवज घेवून, पोबारा केला. या घटनेत सोन्याच्या पट्ट्या, डवली, दोन गंथन, हार, दोन  पाटल्या, लक्ष्मी हार, दोन मंगळसूत्र, चैन, कुंड्यांचा जोड, दोन अंगठ्या आदी सोन्याचे दागिने तसेच 32 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

या प्रकरणी अजिंकेश प्रकाश जाधव (वय 33, रा. बामणोली रोड, माणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार स्वप्नील कदम करीत आहेत.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply