माणगाव पोलिसांनी केले पालकांच्या स्वाधीन
माणगाव : प्रतिनिधी
घरातून निघून गेलेल्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा चार तासांच्या आत शोध घेऊन माणगाव पोलिसांनी तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. माणगाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे राहणार्या मंगला संदिप वाघमारे (वय 28) यांनी त्यांची मुलगी तेजश्री संदिप वाघमारे (वय 13) ही सोमवारी (दि. 27) दुपारी घरात कोणालाही काही न सांगता कोठेतरी निघून गेली असल्याबाबतची तक्रार मंगळवारी (दि. 28) पोलीस ठाण्यात दिली होती. सहाय्यक फौजदार कुवेस्कर आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेजश्री ही तिच्या परिचयातील अर्जुन याच्या सोबत आंबेत कोकरे गावी असल्याची माहिती मिळवली. व तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले आणि अवघ्या चार तासांच्या आत तेजश्रीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरुपपणे सोपविले.