Breaking News

कर्जत तालुका नागरी सहकारी सोसायटीची 30 वर्षांनी निवडणूक

12 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील 20 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कर्जत तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी गुरुवारी (दि. 30) मतदान घेण्यात आले. दरम्यान, या सहकारी पतसंस्थेच्या 12 संचालक पदासाठी 19 उमेदवार रिंगणात आहेत.

तब्ब्ल 30 वर्षांनी कर्जत नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुकीमध्ये मतदान होत आहे.   कर्जत शहरातील ब्राम्हण सभा कार्यलयात असलेल्या मतदान केंद्रावर 631 मतदार असून नेरळ येथील बापूराव धारप सभागृहातील मतदान केंद्रावर 350 मतदार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. मदने यांनी दिली.

कर्जत नागरी पतसंस्थेच्या सर्वसाधारण प्रवर्गातील दहा संचालकांच्या जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात मिलिंद साने, शंभू गोळवणकर, अरुण धारप, अनिल बदले, शैलेश काळे, आनंद काळे, नितीन कांदळगावकर, संजीव दातार, श्रीकांत ओक, विशाल जोशी, विजय गोखले, पद्माकर गांगल, योगेश पोथरकर यांचा समावेश आहे. तर इतर मागासवर्ग गटातील एका जागेसाठी बळवंत घुमरे, रमेश मुंढे, नितीन कांदळगावकर, नरेश क्षीरसागर यांच्यात चुरस आहे. तर भटक्या विमुक्त जाती प्रवर्गमध्ये नंदकुमार मणेर आणि प्रशांत उगले असे दोन उमेदवार आहेत. मतमोजणी कर्जत तेथील मुख्य कार्यालयात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मदने यांनी दिली आहे.

झालेले मतदान

कर्जत केंद्र – 194

नेरळ केंद्र – 185

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply