पेण : प्रतिनिधी
भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना गटाने एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर पेणमधील भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 30) नगर परिषदेसमोरील चौकात जल्लोष केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी पेण नगर परिषद कार्यालयासमोर भव्य टीव्ही स्क्रीन लावण्यात आली होती. या वेळी पेढे वाटप करण्यात आले, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू, माजी नगरसेवक दर्शन बाफना, अजय क्षीरसागर, भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, युवानेते ललित पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, महिला मोर्चा शहर अध्यक्षा सुप्रिया चव्हाण, जनार्दन जाधव, अभिराज कडू, प्रशांत ओक, रवींद्र म्हात्रे, धनश्री समेळ, मितेश शहा आदींसह कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.