Breaking News

जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा

-आरोग्य साहाय्य समितीची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी

‘जैविक कचरा व्यवस्थापन करणे’ हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असतानाही रायगड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये त्याकडे दुर्लक्ष करतात. जैविक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणार्‍या शासकीय अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा आरोग्य सहाय्य समितीचे निमंत्रक डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकार परिषदेमध्ये दिला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.

जैविक कचरा व्यवस्थापन करणे, हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असतानाही रायगड जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय (पेण) आणि जिल्हा रुग्णालय (अलिबाग) ही रुग्णालये जैविक कचरा व्यवस्थापनाविषयी उदासीन असल्याचे उघड झाले आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहासमोर जळाऊ कचर्‍याच्या खोल खड्ड्यात प्लॉस्टिक बॉक्स, सॅनिटरी पॅडस्, कापसाचे गोळे, गोळ्यांची वेष्टने, नारळाचा कचरा फेकलेले आढळले.

शासकीय कामात कुचराई करणार्‍या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अधिकार्‍यांवर, दोषी अधिकार्‍यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच इतकी वर्षे परवाना नूतनीकरण न करणार्‍यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करीत त्यासाठी मंडळाच्या जबाबदार अधिकार्‍याचीही चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आरोग्य साहाय्य समितीच्या माध्यमातून शासनाकडे केली असल्याची माहिती नरेंद्र सुर्वे यांनी या वेळी दिली.

काय आहे ‘आरोग्य सहाय्य समिती’

आरोग्य सहाय्य समिती हा हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम आहे. वर्ष 2018 मध्ये गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनामध्ये ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. आपत्काळात नागरिकांना सहाय्य करण्यासाठी, तसेच आरोग्य क्षेत्रात फोफावलेला भ्रष्टाचार, अपप्रकार, अनियमितता, सर्वसामान्य जनतेची होणारी लूट आदींना आळा घालण्यासाठी ही समिती कार्यरत झाली आहे. आरोग्य सहाय्य समितीच्या या अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्यांची सविस्तर माहिती, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे कटू अनुभव ‘आरोग्य साहाय्य समिती’ला रीेसूर.ीरहरूूरहळपर्वीक्षरर्सीीींळ.ेीस या इमेल पत्त्यावर पाठवावे, असे आवाहनही समितीकडून करण्यात आले आहे.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply