Breaking News

युवकांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी मुंबई : बातमीदार

नेरूळ येथील अनेक युवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय भवनात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी उत्तर भारतीय मोर्चाचे ज्येष्ठ प्रदेश सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ला, युवा प्रदेश संयोजक  विक्रम खुराना, प्रदेश प्रवक्ते  विनोद उपाध्याय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य  सुरेश पाल, जिल्हा सरचिटणीस सुभाष विश्वकर्मा, उपाध्यक्ष  विनोद शहा, उपाध्यक्ष  अध्यक्ष विजय सिंह आणि उत्तर प्रदेश सेलचे संयोजक मार्कंडेय केवट आदी उपस्थित होते. ऐरोलीचे सामाजिक कार्यकर्ते राजेश शुक्ला आणि अमित पांडे यांचे विशेष योगदान होते. प्रदेश सरचिटणीस प्रद्युम्न शुक्ल यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व युवकांच्या सहभागाने आगामी काळात उत्तर भारतीय आघाडी अधिक ताकदवान होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी काळात उत्तर भारतीय समाजातील लोक मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल होणार असून नवी मुंबई महापालिका निवडणुकीत कमळ फुलणार असल्याची ग्वाही उत्तर भारतीय मोर्चा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश राय यांनी वरिष्ठांना दिली.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply