Breaking News

‘एसबीआय’तर्फे ग्रंथ भेट व वृक्षारोपण

नवी मुंबई : बातमीदार

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या 67व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील बँकेच्या शाखेमार्फत नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ग्रंथालयास 200 पुस्तकांची ग्रंथभेट देण्यात आली. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे समाज विकास विभाग उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, स्मारकाच्या सुविधा नियंत्रक  संध्या अंबादे यांचेकडे बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कपील गर्ग आणि नमुंमपा मुख्यालय शाखा व्यवस्थापक शामली आरस आणि इतर अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे देशातील सर्वोत्तम स्मारक म्हणून नावाजले जात असून येथील ग्रंथालय ई-लायब्ररी सुविधेसह अद्ययावत आहे. या पुस्तक भेटीमुळे ग्रंथालयाच्या समृध्दीत भर पडणार आहे.त्याचप्रमाणे बँकेच्या वतीने सेक्टर 21 नेरूळ येथील रॉक गार्ड़न मध्ये 240 देशी प्रजातींची झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी नवी मुंबई महापालिकेचे उद्यान उपायुक्त नितीन नार्वेकर, उद्यान अधिक्षक भालचंद्र गवळी, बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक  कपील गर्ग व नमुंमपा मुख्यालय शाखा व्यवस्थापक शामली आरस उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बकुळ, अनंत, कडुनिंब, करंज, बहावा अशी जैवविविधतेला पूरक देशी वृक्षरोपे लावण्यात आली. बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत ग्रंथभेट व वृक्षारोपण यासारखे उपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल महापालिकेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासनाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत अभिनंदन करण्यात आले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम …

Leave a Reply