Breaking News

विकासात युवकांना प्राधान्य देणारी पनवेल महापालिका

पनवेल महापालिका एक ऑक्टोंबर  2016मध्ये स्थापन झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता महापालिकेत आली. डॉ. कविता चौतमोल पहिल्या महापौर झाल्या. परेश ठाकूर यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार करताना देशाचे भवितव्य असलेल्या युवकांना ही प्राधान्य देण्यात येत आहे. पनवेल शहराचा विकास करताना युवकांसाठी शिक्षण, आरोग्य, सांस्कृतिक  आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  महापालिका काम करीत असल्याचे दिसून येत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या माध्यमातून मल्हार नाट्य करंडकाच्याद्वारे रायगड जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धा सुरू केली. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे, कलेला उत्तेजन देऊन कलेची सेवा करणे. पनवेल क्षेत्रात जास्तीत जास्त नाट्य संस्कृतीचा प्रचार व्हावा यासाठी प्रयत्न करणे या प्रामाणिक हेतूने ही  स्पर्धा सुरू  करण्यात आली. 2014 मध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांपर्यंत पोहचण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पनवेल तालुका अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार अटल करंडक राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा सुरू करण्यात आली. त्यामुळे पनवेलकरांना दर्जेदार नाटके पाहायला मिळाली. इथल्या कलाकारांना नामवंत कलाकारांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे अनेकांना चांगली संधी मिळाली.

पनवेल महानगरपालिकेतर्फे  विविध क्षेत्रात विकास कार्यक्रम राबविले जात आहेत. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रभाग कार्यालये यांच्या बरोबरीने महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे आरोग्य तंदुरूस्त रहावे या विचाराने विविध क्रीडा संकुले बांधण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात उद्याने, मैदाने विकसित करून येथील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन व राज्य पातळीवर विविध खेळात चमकताना पाहायला मिळतात. त्यांच्यासाठी  विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था असावी या विचाराने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. महानगरपालिका हद्दीतील सेक्टर 11, नवीन पनवेल (पूर्व) आदई सर्कल जवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र महापालिकेच्यावतीने लवकरच उभारण्यात येणार आहे. प्रसिध्द किक्रेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या संस्थेची निवड यासाठी करण्यात आली आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनशी  करार करण्यात आला. या मुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे  क्रिकेट खेळाडू तयार व्हावे, यासाठी महापालिकेने  पुढाकार घेतला आहे. पनवेल शहर आणि तालुक्यातील क्रिकेटवीरांसाठी  प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई व इतरत्र जावे लागते. महापालिका उभारत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामुळे नागरिकांची ही अडचण दूर होणार आहे.  या  प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रत्येकवर्षी 10 ते 19 वयोगटातील किमान  101 विद्यार्थांना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधील पन्नास टक्के पनवेल महापालिका क्षेत्रातील, 25 टक्के महापालिका क्षेत्र वगळून रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी आणि 25 टक्के  महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असणार आहेत. पनवेल क्षेत्रातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे. पनवेल महापालिकेमुळे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मे.दिलीप वेंगसरकर फाउंडेशनशी करार करताना विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले. तर दिलीप वेंगसरकर यांच्या सहकार्याने पनवेलमध्ये उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेऊन येथून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू तयार होऊन पनवेल  महापालिका आंतरराष्ट्रीय नकाशावर जाईल असा विश्वास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

खेळाडूंना जास्त संधी मिळेल- प्रतिक मोहीते

पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र मे.दिलीप वेंगसरकर फाउंडेशन तर्फे सुरू होणार ही आनंदाची बाब आहे. पनवेलमधील अनेक मुलामुलींना त्याचा फायदा होईल. आमच्या प्रशिक्षण केंद्रातील मुलांची निवड रायगडच्या संघात झाली आहे. नताशा शर्माची निवड 19 वर्षाखालील रायगडच्या मुलींच्या संघात झाली आहे. तिची खेळण्याची पध्दत पाहून भारताची महिला क्रिकेट खेळाडू शेफाली वर्माच्या बायोग्राफीमध्ये शेफालीच्या  लहानपणीच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. क्रिश बहिरा व पार्थ पवार यांची महाराष्ट्र  प्रशिक्षण केंद्रात निवड झाली आहे. खारघर पर्यंतचा भाग एमसीएमध्ये आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर यांनी दिलीप वेंगसरकर यांच्या सहकार्याने पनवेलला एमसीएमध्ये समाविष्ट करून घेतले तर या खेळाडूंना  जास्तीत जास्त स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळेल. तसेच त्याचा त्यांना फायदाही होईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे  असल्याचे प्रशिक्षक पनवेल क्रिकेट अ‍ॅकेडमीचे प्रतिक मोहिते यांनी बोलताना सांगितले.

खेळाला महत्त्व द्या- दिलीप वेंगसकर

माझे घरच वाजे-वाजापूर येथे असल्याने मी अनेक वेळा पनवेलला  येत असतो. येथील मुलांचा खेळ पाहतो पनवेलच्या मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे. त्यांना व्यासपीठ तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले आयपीएलसह विविध स्पर्धात निश्चित चांगली कामगिरी करतील असा माझा ठाम विश्वास आहे. मी स्वत: आठवड्यातून दोन ते तीन वेळा येणार आहे. एमसीएमध्ये रायगडच्या मुलांना सदस्यत्व मिळाले तर त्यांना खूप फायदा होईल. मी स्वत: आठवड्यातून दोन ते तीन वेळा येणार आहे. खेळामुळे आरोग्य चांगले राहते. मुलांनी खेळाबरोबरच शिक्षणालाही तेवढेच महत्व दिले पाहिजे असे विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी म्हटले आहे.

कामाचे अंदाजित  खर्च- रक्कम रु. 8,84,30,810/-

भूखंडाचे क्षेत्रफळ- 29,899 चौ. मी.(7.47 एकर)

कामाचे स्वरुप- 150 मी. व्यासाचे क्रिकेट मैदान,पॅव्हेलियन इमारत

प्रशिक्षण केंद्र- 421 चौ. मी. (4529.96 चौ फुट )

वाहनतळ क्षमता- 31 चार चाकी वाहने, 40 दुचाकी वाहने व 2 बस

प्रशिक्षण संस्था- मे. दिलीप वेंगसरकर फाउंडेशन

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply