मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील चावणे येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्थेच्यावतीने परिसरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्राथमिक शाळा चावणे व प्राथमिक शाळा कालिवली या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचण येवू नये. यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संस्था (रजि.)चे अध्यक्ष मारुती पाटील, उपाध्यक्ष कृष्णा पाटील, सरचिटणीस प्रकाश सोनावळे, सचिव मधुकर सोनावळे, खजिनदार भरत पाटील यांनी अडचण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दोनशे पानी वह्या संच,पेनसह इतर शालेय साहित्य व खाऊ वाटप केले. या वेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. अरुण पवार, नितीन तेजे, अशोक कचरे, नामदेव पाटील, शालेय शिक्षक पाटील, शालेय शिक्षक चव्हाण उपस्थित होते.