कर्जत : बातमीदार
कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत येथून मुंबई येथे 17 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीसाठी गेले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी थोरवे हे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी तसेच विश्वासदर्शक ठराव जिंकूनच कर्जत येर्थे आपल्या मतदारसंघात पोहचले. चार जुलैच्या रात्री कर्जत येथे पोहचलेले आमदार महेंद्र थोरवे यांचे कर्जत तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले.
गेली वर्षभर शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाचे समजले जाणारे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे राज्य विधिमंडळातून निवडून द्यावयाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी 17 जून रोजी मुंबई येथे पोहचले होते. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक झाली आणि निकमलानंतर त्याच रात्री राज्याचे नगरविकास मंत्री हे आपल्यासोबत असलेल्या आमदारांना घेऊन सुरतला रवाना झाले. सुरतवरून गुवाहाटी तेथून गोवा असा यशस्वी घडामोडी करणारा राजकीय प्रवास करून आपले नेते एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर शिंदे सरकारचा अविश्वास दर्शक ठराव जिंकून शिंदे समर्थक आमदार तब्बल अर्ध्या महिन्यानंतर कर्जतचे आमदार थोरवे हे आपल्या घरी मतदारसंघात पोहचले आहेत.
4 जुलै रोजी कर्जत तालुक्यात येत असताना आमदार थोरवे यांचे स्वागत त्यांचे समर्थक यांनी कर्जत चारफाटा येथे केले. त्यावेळी असंख्य कार्यकर्ते रात्र झाली असतानादेखील उपस्थित होते. त्यानंतर असंख्य गाड्यांचा ताफा महेंड थोरवे यांच्या पोसरी येथील निवास स्थानी पोहचला. तेथे थोरवे यांच्या पत्नी मीना महेंद्र थोरवे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर उपस्थित असंख्य कार्यकर्ते यांनी आमदार थोरवे यांचे राज्यात शिंदे सरकार आल्याबद्दल अभिनंदन केले.