Breaking News

कशेडी घाटात पुन्हा दरड कोसळली

धामणदिवी येथे महामार्गावर लाल मातीचे ढिगारे

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदिवी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 5) सायंकाळी दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक एका मार्गिकेवरून सुरू होती. दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती कशेडी टेप वाहतूक पोलीस कक्षाचे उपनिरीक्षक चांदणे यांनी दिली.

कशेडी घाटात सोमवारी दुपारी चोळई गावाच्या हद्दीत दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी धामणदिवी येथे दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. कशेडी घाटातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी निकाराचे प्रयत्न सुरू असल्याचे या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply