धाटाव : प्रतिनिधी
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त राजमुद्रा फाउंडेशन, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 5) रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 43 रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवला.
भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजमुद्रा फाउंडेशचे संस्थापक अमित घाग, युवा मोर्चाचे रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके, राजमुद्रा कार्यध्यक्ष राजेश भगत, श्रद्धा घाग, भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चा चिटणीस, रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदिका डाके, ग्रामपंचायत सदस्या वैभवी भगत, भाजप कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष विलास डाके, जय हनुमान क्रीडा मंडळ-वाशीचे अध्यक्ष कृष्णा बामणे, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष रोशन चाफेकर, सचिव हाजी कोठारी, वेदांत देशमुख, सुशिल सायकर, निशांत रौठिल, सुनील इंगावले, श्रद्धा कुंढे, दिपीका डाके, कैलास बामणे, विकास बामणे, विकास जोगडे, निलेश जगंम, सागर पोटले, रितेश घाग, श्रीकांत दरडे, निलेश धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थितीत होते.