Breaking News

वैजाळी शाळेत आरोग्य तपासणी शिबिर

अलिबाग : रामप्रहर  वृत्त

माणुसकी प्रतिष्ठान-जितनगर व हाशिवरे हितवर्धक मंडळाची वैजाळी इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मोफत आरोग्य व दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सरोज डाकी, मुख्याध्यापक  प्रतिभा म्हात्रे, प्रज्ञा धसाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे तीनशे मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. माणुसकी प्रतिष्ठानकडून शाळेकरिता दोन प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्या. या वेळी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, दंतरोग तज्ज्ञ डॉ. अक्षय कोळी, डॉ. मनोज पाटील, तानाजी आगलावे, फार्मासिस्ट संजय काळेल, उज्वला चव्हाण, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राजेंद्र कोळी यांनी आभार मानले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply