नवी दिल्ली : वृत्तसंस्था
2021मध्ये कोणत्याही स्पर्धेत भाग घेणार नसल्याचे सांगत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला की, सतत सुरू असलेला प्रवास आणि या सगळ्यात माझी तब्येत ठीक नसल्याने मला ट्रेनिंग सुरू करता आली नाही, यामुळे मी आणि माझ्या टीमने 2021 चा स्पर्धांचा माझा सीझन इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे थोडा आराम करून पुन्हा एकदा ट्रेनिंग करत 2022 मध्ये असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्ससाठी तयारी करणार आहे.
पुढे पुढे नीरज म्हणाला, गेल्या काही आठवड्यांपासून संपूर्ण देशातून अॅथलेटिक्सला मिळालेला पाठिंब्यामुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे आणि भविष्यातही अशा प्रकारे देशाच्या सर्व खेळाडूंना सतत पाठिंबा देत राहा अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.
नीरजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत. ‘टोकियो ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर तुम्ही सर्वांनी मला प्रेम आणि आदर दिल्याबद्दल सर्व देशवासीयांचे खूप खूप आभार,’ असे शेवटी नीरज म्हणाला.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …