कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांचे स्वीकारले नेतृत्व
पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर तालुक्यातील वरोसे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वरोसे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे.
आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) सायंकाळी वरोसे गावात झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार देवेंद्र साटम, वासांबे ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन तांडेल, चौक विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, गणेश कदम, युवा नेते भूषण पारंगे, प्रवीण ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शिवसेनेतून पंकज निकाळजे, प्रवीण निकाळजे, योगेश गायकवाड, जगदिश निकाळजे, उमेश निकाळजे, नितीन निकाळजे, रूपेश दत्ता निकाळजे, रूपेश वामन निकाळजे, सुभाष निकाळजे, किशोर निकाळजे, अंकुश निकाळजे, राहुल निकाळजे, सागर निकाळजे, आकाश निकाळजे, अश्विनी चाळके यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत केले.
आमदार महेश बालदी यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामांचा झंझावात सुरू केला आणि विकासाचा आलेख उंचावला. त्यामुळे विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढत असून वरोसे येथील शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.