Breaking News

काळसेकर पॉलिटेक्निकतर्फे करिअर मार्गदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त

अंजुमन-ए-इस्लाम या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या एन. बी. ए. मानांकित अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलद्वारे नुकतेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करीअर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमास विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. 200हून अधिक विद्यार्थी, पालक, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुर्हान हारीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच काळसेकर कॅम्पस संचालक डॉ. अब्दुल रझाक होनुतागी आणि पनवेल नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सईद मुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विशेष मार्गदर्शक डी. टी. ई., मुंबईचे जे. आर. नीखाडे, विशेष कर्तव्याधिकारी वाय. बी. जामनिक, सदफ शेख तसेच काळसेकर पॉलिटेक्निकचे अमीर सिवानी यांनी विविध विषयांवरील शंकांचे निरसन केले. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात मुंबई, नवी मुंबई ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी येथील 70हून अधिक शाळांतील दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर आय. काझी, व जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख यांच्या प्रेरणा आणि पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमझान खाटीक यांचे मार्गदर्शन लाभले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply