पनवेल ः रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सामाजिक बांधिलकीतून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील दोन विद्यासंकुलांना त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण 35 लाख रुपयांची भरघोस देणगी दिली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील पुंजाजी रामजी भोर विद्यालय आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाकरिता 25 लाख रुपये इतकी देणगी दिली. त्याचप्रमाणे पांगरी येथील श्री संत हरीबाबा विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे. एकूण 35 लाख रुपयांची ही देणगी ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. यांच्या सीएसआर फंडातून देण्यात आली असून मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) प्रदान करण्यात आला. या वेळी पुंजाजी रामजी भोर विद्यालयाचे मुख्याध्यापक काशिनाथ तळपाडे आणि मुख्याध्यापक राजेंद्र काकड उपस्थित होते. त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले. या योगदानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुसज्ज इमारतीमध्ये शिक्षण घेता येणार आहे.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper