Breaking News

रेशन दुकानात ग्राहकांना समस्यांचा वेढा

भारतीय खाद्य निगमकडून तहसीलदारांना निवेदन

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील रेशन दुकानांत ग्राहकांना आजही अनेक सुविधा मिळत नसून, अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत भारतीय निगम मंडळाने कर्जत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय धारक, केशरी कार्ड, एपीएल या रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानांतून अन्नधान्य दिले जाते, मात्र धान्य खरेदी करताना ग्राहकांना रेशन दुकानावर पावती दिली जात नाही. त्यामुळे पैसे जास्त घेतले जातात का, हे समजून येत नाही. तर कुठल्या दराने ग्राहकाने धान्य खरेदी केले, हेदेखील समजून येत नाही. बायोमेट्रिक मशीनमध्येही बिघाड होणे नित्याचे झाले आहे. वेगवेगळी करणे देऊन धान्यापासून लाभार्थ्यांना वंचित ठेवले जाते. हेच धान्य काळ्याबाजाराने विकले जात असल्याच्या तक्रारी आल्याने भारतीय खाद्य निगमचे सदस्य दिपक तांबे यांच्याकडे आल्याने त्यांनी वैयक्तिक निरीक्षणही केले. त्यात तथ्य आढळल्याने त्यांनी कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. तसेच अशा काळाबाजार करणार्‍या रेशन दुकानदारांवर सक्त कारवाई करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. यावेळी विनय गायकवाड, मधुकर देशमुख, नरेश शेळके, जीवन गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply