उरण : प्रतिनिधी
भर पावसात उरण वनविभागाच्या अधिकार्यांनी कळंबुसरे गावातील एका रहिवाशाच्या अनधिकृत घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता बुलडोझर फिरवला आहे.उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील एका रहिवाशाने गावात कुटुंबाच्या गरजेपोटी वाढीव घराचे बांधकाम केले होते. वनविभागाच्या अधिकार्यांनी या घरावर भर पावसात बुलडोझर फिरवला. ऐन पावसात संपूर्ण घर उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
कळंबुसरे गावातील रहिवाशांनी वनक्षेत्रात घर बांधले होते.त्यामुळे वनविभागाने कारवाई केली आहे. वनविभागात कोणी अतिक्रमण केले तर कारवाई करण्यात येईल.
-कोकरे, वन अधिकारी, उरण