Breaking News

पनवेलच्या रोहिदास वाड्यात समाजमंदिराची उभारणी

महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रोहिदास वाड्यात उभारण्यात आलेले समाजमंदिर हे महपालिका क्षेत्रातील एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित अशी वास्तू येणार्‍या काळात बनेल, असा विश्वास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. शहरातील रोहिदास वाड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी (दि. 8) आयोजित करण्यात आला होता. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांच्या हस्ते या समाजमंदिराचे लोकार्पण करण्यात आले. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील रोहिदास वाड्यात समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिर उभारणीसाठी दोन कोटी 62 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून यामध्ये वाचनालय, जीम, टेबल टेनिस, कॅरम बोर्ड तसेच सामाजिक कार्याक्रमांसाठी सभागृह उपलब्ध करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्याला पनवेल महापालिकेचे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, रोहिदास समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण कल्याणकर, शशिकांत मोहोकर, दिनकर गव्हाणकर, संजय जाधव, प्रवीण मोहोकर, रजनिश जाधव, यशवंत जाधव, तानाजी झुगे, मधुकर उरणकर, शांताराम कल्याणकर, प्रवीण दुमशीकर, राकेश जाधव, जिज्ञेश मोहोकर, सिद्धार्थ मोहिते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या मंदिरात बांधण्यात आलेल्या सभागृहाचे नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply