उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
मुसळधार पावसात घर अंगावर कोसळून एका आदिवासी बांधवांचा जागीच मृत्यू, तर त्याची पत्नी, मुले जखमी झाल्याची घटना उरण तालुक्यातील जांभुळपाडा आदिवासी वाडीत घडली.
मागील पाच दिवसांपासून पडणार्या जोरदार पावसाने उरण तालुक्याला झोडपून काढले आहे. सततच्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून काही रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले. त्यातच रात्रीच्या सुमारास वार्यासह आलेल्या पावसामुळे चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जांभूळपाडा आदिवासी वाडीतील एक कौलारू घर कोसळले. यात राम कातकरी या आदिवासी बांधवाचा जागीच मृत्यू झाला, तर घरातील महिला व मुले जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गावातील आशासेविका, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्गाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाने अंतर्गत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper