Breaking News

दीपावलीसाठी रोहा बाजारपेठ सजली

कोरोनाच्या सावटामुळे तेजी नाही

रोहे : प्रतिनिधी

येथील बाजारपेठ दीपावलीच्या साहित्याने सजली आहे. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली असली तरी या वर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत तेजी नसल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रोहा बाजारपेठेतील दुकाने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्यांनी सजली आहेत. बाजारपेठेतील दुकाने आकाश कंदील, विद्युत तोरणे, फटाके आदी साहित्याने सजली आहेत. ठिक ठिकाणी स्थानिकांच्या मातीच्या पणत्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. भांडी, कपडे तसेच विविध भेटवस्तूंची दुकाने सजली आहेत. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे सामान खरेदी करण्यासाठी गृहिणी किराणामालाच्या दुकानात गर्दी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर रांगोळीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी  बाजारात महिलांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील मिठाईच्या दुकानात विविध प्रकारची मिठाई विक्री सज्ज झाली आहे. फटाके खरेदीसाठी बच्चेकंपनी बाजारात येताना दिसत आहे. बोनस आणि पगाराचे दिवस असल्याने चाकरमानी बाजारात कपडे अन्य साहित्य खरेदी करताना दिसत आहेत.

रोहा बाजारपेठेत सायंकाळी खरेदीसाठी येणारे बहुसंख्य ग्राहक मास्क वापर करतात. मात्र बाजारपेठ सजली असली तरी कोरोनाचे सावट असल्याने यावर्षी बाजारात तेजी दिसून येत नाही.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply