Breaking News

पाकला दणका! कुलभूषण खटला स्थगित करण्याची मागणी फेटाळली

हेग : वृत्तसंस्था

कुलभूषण जाधव खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंगळवारी (दि. 19) फेटाळली. पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजी) खटला सुरू आहे.

भारताने सोमवारी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले होते की, एका निर्दोष भारतीयाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात काढावी लागत आहेत. त्यावर पाकिस्तानच्या वकिलांनी भारताच्या आरोपांना उत्तर देताना आपली बाजू मांडली.

पाकिस्तानच्या अ‍ॅटर्नी जनरलने आपल्या युक्तिवादाची सुरुवातच खोट्या विधानांनी केली. जाधवच नव्हे; तर भारतावरही पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला. पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल मन्सूर खान म्हणाले की, मी स्वतः भारतीय क्रूरतेचा शिकार आहे. मी तरुण लष्करी अधिकारी म्हणून भारतीय तुरुंगात कैद होतो. पाकिस्तानमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 140 मुलांचे जीव गेले. हा भारताचा पाठिंबा असणार्‍या अफगाणिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला होता.

‘जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होता आणि त्याने पाकिस्तानात दहशत पसरवण्यासाठी अनेक पाकविरोधी शक्तींना सुसाइड बॉम्बर बनवण्यासाठी तयार केले होते. पाकिस्तानच्या विकासातील महत्त्वाचा भाग असणार्‍या चीन-पाकिस्तान कॉरिडोरच्या मार्गात अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले. हे कुणा एका व्यक्तीचे काम नाही. पूर्ण देश याला खतपाणी घालत आहे,’ असा युक्तिवाद पाकिस्तानने केला आहे.

दरम्यान, कोर्टाने तिसर्‍या दिवसापर्यंत सुनावणी स्थगित केली आहे. बुधवारी (दि. 20) पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply