
श्रीवर्धन : सध्या भर उन्हाळ्यात सूर्यनारायण आग ओकत असताना उगवतीच्या वेळी मात्र तो काहीसा शीतल भासतो. त्यात ढग आले असतील, तर वातावरण काहीसे गूढ भासू लागते. असेच सकाळीच्या वेळी आभाळात भरून आलेल्या ढगांतून होणार्या सूर्योदयाचे वडवली येथे टिपलेले विलोभनीय दृश्य. (छाया : अमेय नाझरे)