Breaking News

श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

श्रीवर्धन : प्रतिनिधी

तालुक्यातील 2 हजार 501 शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती श्रीवर्धनचे तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांनीं दिली.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकर्‍याच्या बँक खात्यात वर्षभरामध्ये तीन टप्यांत सहा हजार रूपये जमा होणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आतापर्यत 14 लाख 26हजार 927शेतकर्‍यांच्या बॅक खात्यात पहिला हप्त्ाा जमा करण्यात आला आहे.

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी माहिती अपलोड करताना संबंधीत शेतकर्‍याची माहिती बर्‍याच वेळा अपुरी पडते,  काही तांत्रिक अडचणी येतात. तसेच काहीच्या अधारकार्ड, बॅक खाते इत्यादीची माहिती वेळेवर मिळतेच असे नाही. ही कागदपत्रे देताना दिंरगाई झाल्याने संबंधीत शेतकर्‍याची माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया लांबत जाते. मात्र ही सतत चालेली प्रक्रिया आहे. तरीही लवकरच पात्र शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे तहसिलदार  सूर्यवंशी यांनी सांगितले.

श्रीवर्धन तालुक्यातील 5 हजार 201 शेतकर्‍यांपैकी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी 4 हजार 583 नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यामधील 2 हजार 501 शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, उर्वरित शेतकर्‍यांना काही महिन्यात लाभ मिळणार आहे.

-जयराज सूर्यवंशी, तहसीलदार, श्रीवर्धन

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply