Breaking News

पाकिस्तान मुर्दाबादच्या नार्याने म्हसळा शहर दुमदुमले

म्हसळा : प्रतिनिधी

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकीस्तानव्याप्त बालकोट भागात केलेल्या कारवाईबाबत म्हसळ्यातील नागरिकांनी  आनंद व्यक्त केला. शहरांतील सोशल मिडिया मार्फत आनंद व्यक्त होत असतानाच असल कादरी, सुवेल हवलदार, नईम दळवी, खालीद काजी, सुबान हळदे, अकमल कादरी या युवकांनी नेतृत्व करीत म्हसळा शहरातून भारतीय हवाई दलाचा जयजयकार केला. यावेळी त्यांनी भारत झिंदाबाद, पाकीस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी म्हसळा शहर दणाणून सोडले. म्हसळा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाला प्रणाम करुन या विजयी रॅलीची सांगता झाली.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply