नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाचे सर्वोच्चपद अर्थात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 18) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीसाठी देशभरातील आमदार-खासदारांनी मतदान केल्याने भरघोस मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलैला शपथ घेतील.
या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)कडून झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू विरुद्ध संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे यशवंत सिन्हा अशी लढत आहे. एनडीएचे संख्याबळ आणि इतर पक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
देशाच्या 16व्या राष्ट्रपतिपदासाठी मुंबई येथील महाराष्ट्र विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्यांनी मतदान केले.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …