Breaking News

पोलादपूर शहरामध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा

नगरपंचायतीच्या विरोधी गटनेत्याकडून आंदोलनाचा इशारा

पोलादपूर : प्रतिनिधी

नगरपंचायत पोलादपूरकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील जयहनुमाननगर भागात टँकरद्वारे गढूळ तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत असून, या पाण्याला उग्र वास येत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान, नगरपंचायतीचे विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी शुध्द पाणी मिळेपर्यंत जयहनुमाननगरच्या ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पोलादपूर नगरपंचायतीच्या जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल गेल्या वर्षी अतिवृष्टीदरम्यान वाहून गेल्यानंतर आजमितीस त्याजागी दुसरी जॅकवेल उभारण्यात आला नसल्याने शहरामध्ये नवीन विस्तारीत नळ पाणीयोजनेच्या पाइपलाइनमधून पाणीपुरवठा केला जात असतो. मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरण कामादरम्यान या पाइपलाइनचे नुकसान झाले. त्यामुळे शहरातील हनुमाननगर भागात काही दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे दुषीत पाणीपुरवठा झाल्याने सुमारे 10-15 नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्याने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलेले नगरपंचायतीमधील विरोधी गटनेते दिलीप भागवत आणि नगरसेवक निखिल कापडेकर यांनी गरपंचायतीमार्फत पाठविण्यात आलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना ब्लिचिंग पावडरचे प्रमाण अतिरिक्त ठेवल्याने हे पाणी पिण्यालायक राहिले नसल्याचा आरोप केला असून, शुध्द पाणी मिळेपर्यंत स्थानिक नागरिकांसोबत ठिय्या देण्याचा इशारा दिलीप भागवत यांनी दिला.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply