Breaking News

गणपती बाप्पा रंगवा स्पर्धेला बच्चेकंपनीचा प्रतिसाद

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम

पनवेल ः वार्ताहर

आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कला-गुणांना वाव मिळावा यासाठी नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमी प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून कोविडमुळे घरात बसून राहण्याची जबरदस्तीच्या सुटीमुळे कंटाळलेल्या प्रभाग क्रमांक 18च्या लहान मुलांसाठी गणपती बाप्पा रंगवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेस बच्चेकंपनीचा भरघोस प्रतिसाद लाभला.

पनवेलमधील चिंतामणी हॉल येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. झाले. 5 ते 9 आणि 10 ते 15 पंधरा वर्ष अशा दोन वयोगटांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनामुळे लहान मुलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. दोन्ही गट मिळून 250 मुले-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.  माझा बाप्पा किती छान, माझा बाप्पा माझा अभिमान या सेल्फी पॉइंटवर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या बरोबरच बच्चेकंपनीनेही सेल्फी काढली. सहभागी सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभागपत्र देण्यात आले.

या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व नगरसेवक मनोज भुजबळ, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, संजना कदम, भाजप युवा नेते समीर कदम, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, भाजप नेते प्रदीप देशमुख, भाजप नेते देविदास जी खेडकर आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply