Breaking News

भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आणि जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. पनवेलमधील तलाव हे आपले वैभव आहेत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जलतरण स्पर्धेवेळी केले.
जलतरण स्पर्धा पनवेल महापालिकेच्या कार्यालयासमोरील देवाळे तलावात आणि रक्तदान शिबिर मिरची गल्लीतील वैश्य समाज हॉलमध्ये घेण्यात आले. रक्तदान शिबिरात 90हून अधिक जणांनी रक्तदान केले, तर जलतरण स्पर्धेलाही प्रतिसाद लाभला.
जलतरण स्पर्धेतील 100 मीटर फ्री स्टाईल मुलांच्या गटात प्रथमेश सुर्वे प्रथम, अथर्व म्हात्रे द्वितीय, ऋतुराज म्हात्रे तृतीय, 50 मीटर फ्री स्टाईल मुलींच्या गटात कल्याणी रायकर प्रथम, महती पाटील द्वितीय, त्रिशा कोंडाळकर तृतीय, 50 मीटर फ्री स्टाईल मुलांच्या गटात प्रणय लाड प्रथम, अनय रोहीत द्वितीय, प्रिन्स कटावले तृतीय, तर 200 मीटर फ्री स्टाईल खुल्या गटात मधुरा पाटील प्रथम आली.
सर्व विजेत्यांना महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, या वेळी मराठी इंडियन आयडल विजेते सागर म्हात्रे यांचीही उपस्थिती लाभली तसेच या स्पर्धेत दोन वर्षांच्या चिमुरडीने सहभाग घेतला होता. तिचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमांना भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, मनोहर म्हात्रे, मुकीत काझी, पापा पटेल, अजय बहिरा, विकास घरत, के. डी. म्हात्रे, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, इक्बाल काझी, उद्योजक राजू गुप्ते, प्रवीण मोहोकर, आयोजक जवाद काझी, प्रशांत कर्पे, अल्पसंख्याक सेलचे शहर अध्यक्ष निसार सय्यद, आकाश भाटी, रजत जगे, किशोर बाबरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply