Breaking News

संसदेत शिवसेनेचा गट स्थापणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राजधानी दिल्लीत घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेनेच्या 12 खासदारांनी आज हिंदुत्ववादी विचारांना आणि युतीचे सरकार स्थापण्याला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यानंतर आम्ही संसदेत शिवसेनेचा वेगळा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. राहुल शेवाळे गटनेते असतील, तर भावना गवळी मुख्य प्रतोद असतील, असे सांगत महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेत आलेय. आता खासदारांच्या भूमिकेने केंद्राचेही पाठबळ मिळेल आणि महाराष्ट्रात विकासकामांचा धडाका दिसेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि. 19) येथे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या 12 खासदारांचा गट स्थापन करण्यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. याबाबत बैठक आणि चर्चा झाली. हे दोन विषय महत्त्वाचे असल्याने मी दिल्लीत आलो होतो. प्रथम मी शिवसेनेच्या 12 खासदारांचे स्वागत करतो. त्यांनी घेतलेली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन केले आहे.
संजय राऊत दखल घेण्यासारखे नाहीत
दबावापोटी खासदार फुटले आहेत अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून केली जात आहे. याबाबत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सणसणीत टोला लगावला. दुसरे कोण बोलले असते तर मी बोललो असतो, पण संजय राऊत काही दखल घेण्यासारखे नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले तसेच राऊत रोज सकाळी मॅटिनी शो घेतात. त्यांच्या बोलण्याला काय महत्त्व द्यायये, असेही ते म्हणाले.
या खासदारांचा समावेश
श्रीकांत शिंदे (कल्याण), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई), हेमंत पाटील (हिंगोली), संजय मंडलिक (कोल्हापूर), राजेंद्र गावित (पालघर), प्रताप जाधव (बुलडाणा), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), हेमंत गोडसे (नाशिक), कृपाल तुमाने (रामटेक), श्रीरंग बारणे (मावळ), धैर्यशील माने (हातकणंगले), सदाशिव लोखंडे (शिर्डी) या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

Check Also

पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ …

Leave a Reply