Breaking News

संस्कारधाम विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील खरवली  बिरवाडी येथील संस्कारधाम विद्यालयातील मराठी माध्यमाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस  सुरूवात झाली आहे. या स्पर्धांचे उद्घाटन कबड्डीपटू गणेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. शिस्त, जिद्द, आणि चिकाटी हे खेळाचे अविभाज्य अंग असल्याचे गणेश पाटील यांनी या वेळी सांगितले.

क्रीडा शिक्षक सकपाळ यांनी या वेळी स्पर्धकांना क्रीडा शपथ दिली. शाळेतील विद्यार्थी राहुल देवळे आणि चैताली दरवडा यांनी प्रातिनिधिक स्वरूपात उंच उडी मारली. पालक प्रतिनिधी शशिकांत राजे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका भारती कदम यांनी खेळ आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नैना मॅडम यांनी केले. यावेळी पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी आणि पालक प्रतिनिधी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply