Breaking News

मेळाव्याचे महाभारत

दसर्‍याला अद्याप महिनाभराहून अधिक अवकाश असला तरी गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीयवर्तुळात मात्र गाजतो आहे तो शिवाजी पार्कवरील ‘दसरा मेळावा’च! आताच्या घडीला शिवसेनेतील उद्धवठाकरे समर्थकांचा गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट आणि महाराष्ट्रनवनिर्माण सेना अशा तिघांकडूनही हा मेळावा घेण्याच्या दिशेने हालचाली सुरू असून उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी मात्र जे नियमात आहे ते होईल अशी भूमिका प्रारंभीच व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. शिवसैनिकांनीखच्चून भरलेल्या शिवाजी पार्कवर भाषणासाठी कमरेवर हात ठेवून उभे असलेले बाळासाहेब ही प्रतिमाआजही सहज नजरेसमोर येते. याच दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामुळेच या मेळाव्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचे तसेच विश्लेषकांचे लक्ष असे. परंतु शिवसेनेची धुराउद्धव ठाकरे यांच्याकडे आल्यानंतर मात्र हा मेळावा बाळासाहेबांच्या सभांसारखा कधीच गाजला नाही. उद्धवठाकरे यांच्या ठायी बाळासाहेबांसारखे अमोघ वक्तृत्व नाहीच मुळी. सर्वज्ञात असलेली हीच बाब आताइतक्या वर्षांनी अधोरेखित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकार्‍याने, महाराष्ट्रात राज ठाकरेयांच्याच सभा खर्‍या अर्थाने गाजतात, तेव्हा त्यांनीच यंदाच्या दसर्‍याला शिवाजी पार्कवर ज्वलंत हिंदुत्ववादीविचारांचे सोने लुटावे अशी मागणी शुक्रवारी एका पोस्टद्वारे केली. ही मागणी केली जाण्याच्या आदल्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतल्यामुळेशिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्कवर संयुक्त मेळावा घेणार की काय असे अंदाजहीव्यक्त होत आहेत. शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काल तब्बल 50 मिनिटे चर्चा झाल्याने आगामी मुंबईमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र येतील कीकाय अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या आगामी मुंबईभेटीदरम्यान राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार असून भाजप-मनसे युतीचा नारळ शहा यांच्या मुंबईदौर्‍यादरम्यान फुटेल अशी भाकितेही प्रसारमाध्यमांकडून वर्तवण्यात येत आहेत. अर्थात अमित शहा यांच्यामुंबई दौर्‍यातील तपशीलांची आपल्याला काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. ठाकरे गट आणि शिंदे गट यादोघांचेही मेळाव्यासाठी परवानगी मागणारे अर्ज मुंबई महापालिकेकडे जमा झाले आहेत. त्यासंदर्भातीलनिर्णय होईपर्यंत हे राजकीय चर्वितचर्वण सुरूच राहील यात शंका नाही. एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनतापक्षासोबत राज्यात सत्ता स्थापन केली. यावेळी शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षातील आमदारांचा मोठा गटआपल्यासोबत असल्यामुळे सुरूवातीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला गट हीच खरी शिवसेनाअसल्याचे सांगत आले आहेत. अर्थात यासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळेशिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी नेमक्या कोणत्या गटाला परवानगी दिली जावी हे ठरवणेआव्हानात्मकच आहे. गणपती बाप्पा मंडपात येऊन तूर्तास उणुपुरे तीन दिवसच झाले आहेत. एरव्ही खरे तरपितृपक्ष संपल्यानंतर नवरात्र-दसरा-दिवाळीची ओढ सर्वसामान्यांना लागते. यंदा मात्र गणेशोत्सवापासूनचदसर्‍याला विचारांचे सोने लुटण्याची घाई काही राजकीय नेत्यांना झालेली दिसते आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply