Breaking News

गोरख ठाकूर व मित्र परिवारातर्फे वीज कर्मचार्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मदत

उरण : बातमीदार

कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे  खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या मार्फत शुक्रवार (दि. 22) सकाळी 11.30 वाजता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली. तसेच वीज कर्मचार्‍यांचा सत्कार देखील करण्यात आला.

उरण पूर्व विभागात वीज खूप मोठ्या प्रमाणात खंडित होत असते व त्याचा त्रास पूर्व विभागातील लोकांना होत असतो. परंतु हा त्रास कमी करण्याचे काम हे चडएइ चे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचा काम करत असतात. अशा मेहनती वीज कर्मचार्‍यांचा सत्कार  यावेळी करण्यात आला.सहाय्यक अभियंता प्रथमेश मयेकर आणि टीमचा शाल श्रीफळ, भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आर्थिक मदत करण्यात आलेले विद्यार्थी हे 10 वी व 12 वी मध्ये पहिले दुसरे आलेले आहेत त्यांना 10 वी व 12 वी ला 75 ते 90% मार्क मिळालेले आहेत.परंतु घरची आर्थिक परिस्थिती ही  उच्च शिक्षण घेण्यासारखी नसल्या कारणाने त्यांना गोरख ठाकूर व मित्र परिवाराकडून छोट्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली आहे. कु.  तृप्ती चिंतामण पाटील, सुजल रमाकांत म्हात्रे, चैतन्य कैलास घरत आणि सोहम जगजीवन पाटील या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी खोपटे स्कूल कमिटीचे चेअरमन राजन पाटील, वीज वितरणचे सहाय्यक अभियंता प्रथमेश मयेकर, आणि त्यांचे सहकारी, जयेशा ठाकूर ( माता पालक संघटना), म्हात्रे, भोईर, कोमल पाटील, भुपेंद्र ठाकूर, खुशाल घरत, विनोद पाटील, तेजस भगत आदि उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply