Breaking News

पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी

 सराईत गुन्हेगारा गजाआड; 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल ः वार्ताहर

पनवेल परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील पंप रूमचे बंद खिडकीची काच उघडून अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करून कॉम्प्युटर लॅबमधील 60 हजार रुपये किमतीचे कॉम्प्युटर, प्रिंन्टर व इतर साहित्य चोरून नेला होता, तसेच दिलीप करमसिंग धरोड (वय 61) यांचे धिरज लॉन्ड्रीचे पाठीमागील खिडकीचे ग्रिल कापून देव्हार्‍यातील महागड्या वस्तू व देवाच्या चांदीच्या मूर्ती चोरीस गेल्या होत्या. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि. प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेतला.

तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या मिळालेल्या माहितीद्वारे सदर गुन्ह्यातील आरोपी फैझान संतोष परमार (वय 32 वर्षे) हा पाशीबाई इंदिरानगर झोपडपट्टी या ठिकाणी वास्तव्यास असल्याचे माहिती मिळाली. या ठिकाणी सापळा रचून पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून वरील दोन्ही गुन्ह्यातील सुमारे 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपीच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टायर चोरीप्रकरणी चार आरोपी जेरबंद

पनवेल ः अपोलो कंपनीच्या महागडे टायरच्या चोरी प्रकरणी 4 आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या अटकेमुळे अजूनही चोरीच्या गुन्ह्याची उकल होणार आहे.

हनुमान सुरनूर (वय 30) याने ट्रेलर (नं. एमएच 21 बीएच 3216) आजिवली- शेडुंग बायपास रोड येथे रस्त्याच्या बाजुला असलेल्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवला होता. त्यातील 69 हजार रू. किमतीचे तीन टायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या घटनेची तत्काळ दखल घेत पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पनवेल परिसर व भोसरी, पुणे परिसरातून या गुन्ह्यातील आरोपी विकास डोंगरे (वय 26), वैभव खळगे (वय 22) विशाल पवार (वय 21) तसेच राजेश नागापुरे (वय 31) यांना जेरबंद करण्यात आले आहे.

खंडणीप्रकरणी चौघांना अटक; 24 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

पनवेल ः वार्ताहर

15 लाखांची खंडणी दे, अन्यथा तुला ठार मारू अशी धमकी देणार्‍या चौघा आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी 24 तासांत अटक केली असून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका केली आहे.

उपासना कमलकिशोर खबानी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कमलकिशोर खबानी व रिझवान नावाच्या व्यक्तीचे व्यावसायिक वाद होते. त्या वादातून रिझवान याने उपासना यांच्या पतीचे अपहरण करून सुटकेसाठी 15 लाख रुपये मागत आहे आणि नाही दिले तर कमलकिशोर यांना ठार मारेन अशी धमकी देत असल्याचे पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना सांगितले.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तत्काळ तपास पथके स्थापन करण्यात आली. तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार त्याचा शोध घेण्यासाठी भिवंडी परिसरात पोलीस पथक रवाना करण्यात आली. शोध घेत असताना आरोपी हा नेरळ, कर्जत येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन अपहरण झालेल्या कमलकिशोर खबानी यांची आरोपी रिझवान अहमद अब्दुल गफुर शेख व इतर तीन आरोपींचे ताब्यातून सुखरूप सुटका केली व सदरचा गुन्हा हा 24 तासाचे आत उघडकीस आणला.

गुन्ह्यातील अटक आरोपींची नावे रिझवान अहमद अब्दुल गफुर शेख 35, सैजाद मोहमद अन्सारी 34, वासिम अन्वर खान 37, इस्लाम उस्मान युसुफ शेख 34 सर्व रा. भिवंडी, ठाणे असून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार हस्तगत करण्यात आली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply