Breaking News

इंग्लंड दौर्‍यासाठी साहा सज्ज; कोरोना चाचणी आली निगेटिव्ह

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आता तो इंग्लंड दौर्‍यावर जाऊ शकेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकेसाठी तो टीम इंडियाचा भाग असेल. इंग्लंड दौर्‍यासाठी साहाची 20 सदस्यीय संघात निवड झाली, मात्र त्याची अंतिम निवड तंदुरुस्तीवर आधारित होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याव्यतिरिक्त भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकादेखील खेळायची आहे. यापूर्वी वृद्धिमान साहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा कोरोना झाल्यासंबंधी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने आपली प्रतिक्रिया दिली. आयपीएलमध्ये 4 मे रोजी हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी साहा करोना पॉझिटिव्ह आढळला होता. आयपीएल 2021चा हंगाम त्याच दिवशी पुढे ढकलण्यात आला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply