Breaking News

शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्यावर शेकापकडून टीका

खालापूरमध्ये पोलिसांमुळे संघर्ष टळला

खोपोली ः प्रतिनिधी
नगरपंचायत निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घरात घुसण्याची केलेली चिथावणीखोर भाषा खालापूरच्या संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत शेकापच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी आमदारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
खालापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला. यामध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक आठ जागा आल्यानंतर खालापूरमध्ये विजयी मिरवणुकीत आमदार महेंद्र थोरवे आणि तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शहरातील छत्रपती शिवाजी चौकात विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आमदार महेंद्र थोरवे यांनी आवेशपूर्ण भाषण केले. भाईऐवजी दादा खालापूरात चालणार असून शिवसेनेच्या नादी लागाल तर शिवसैनिक घरात घुसतील, असा इशारा त्यांनी शेकापला दिला.
आमदार थोरवे यांच्या वक्तव्यानंतर निघालेली विजयी मिरवणूक शेकाप नेते संतोष जंगम यांच्या घरासमोरून जात असताना दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाले. घोषणाबाजीने वातावरण तापले, परंतु पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि पथकाने कार्यकर्त्यांना वेळीच आवर घातल्याने संघर्ष टळला.

निवडून आल्यावर आमदार एका पक्षाचे राहत नाही. जनतेचे असतात. आम्ही जनतेचा कौल मान्य केला. कोणताच पक्ष बहुमतात नाही. त्यामुळे आमदारांनी घरात घुसू ही वापरलेली भाषा खालापूरच्या संस्कृतीत बसत नाही. तरुणाईला चुकीच्या मार्गाने नेणारे मार्गदर्शन असावे.
-शिवानी जंगम, माजी नगराध्यक्ष, खालापूर नगरपंचायत

 

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply