काठमांडू : नेपाळमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत दुहीची परिणती संसद बरखास्त होण्यात झाली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या शिफारसीनंतर अध्यक्ष विद्यादेवी भंडारी यांनी रविवारी (दि. 20) संसद बरखास्त करीत मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली. पुढील वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात ही निवडणूक होणार आहे. भारतातील तीन गावे नेपाळमध्ये दर्शविणारा नवा नकाशा ओली यांच्या सरकारने जूनमध्ये मंजूर केल्यानंतर सरकारमधील वाद वाढीस लागले आहेत. माजी पंतप्रधान पुष्पकुमार दहल प्रचंड यांनी भारताच्या विरोधात भूमिका घेणार्या ओली यांना कडाडून विरोध केला होता तसेच त्यांच्या राजीनामाच्या जोरदार मागणी लावून धरली होती. समोर पर्याय दिसत नसल्याने ओली यांनी अखेर संसद बरखास्त करण्याची शिफारस केली असे बोलले जात आहे.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …