Breaking News

नागोठण्यात धाडसी विरांचा सन्मान

नागोठणे : प्रतिनिधी

पोलीस आणि रेस्क्यू पथकातील धाडसी विरांचा  नागोठणे पत्रकार संघाने पोलीस ठाण्याच्या श्री दत्त मंदिरात तुळशीचे रोप, गुलाब पुष्प, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

नागोठणे परिसरातील चिकणी आणि पळस येथे 12 आणि 13 जुलै रोजी पुराच्या पाण्यात अडकलेल्या मानवी जीवांबरोबर मुक्या प्राण्यांचेही जीव वाचविण्याची धाडसी कामगिरी स्थानिक पोलिसांसह कोलाड येथील वायडर वेस्ट डव्हेंचर या संस्थेच्या सदस्यांनी पार पाडली होती.  या सर्व धाडसी वीरांचा नागोठणे पत्रकार संघाने सन्मान केला.

नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे यांनी प्रास्ताविक केले. उपनिरीक्षक नारायण चव्हाण यांनी स्वानुभव सांगितला. भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, शिवसेनेचे किशोर जैन, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांची समयोचित भाषणे झाली. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पं.स.माजी सदस्य बिलाल कुरेशी, माजी सरपंच विलास चौलकर,भाजपचे अशोक अहिरे, शिवसेनेच्या दर्शना जवके, लायन्स क्लबचे अध्यक्ष अनिल गीते, तसेच अशपाक पानसरे, प्रणिता पत्की, धनंजय जगताप, हभप बापू महाराज रावकर, हभप विजय महाराज शहासने, पोलीस पाटील बबन शिंदे आणि विठ्ठल शिंदे, पत्रकार राज वैशंपायन, संदेश गायकर, मंजुळा म्हात्रे, पत्रकार संघाचे सचिव महेंद्र माने, खजिनदार पुरुषोत्तम घाग, सहसचिव मनोहर सकपाळ, सदस्य मिलिंद घाग, संकल्प माने, निलेश म्हात्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी, वायडर वेस्ट डव्हेंचरचे सदस्य आणि नागरिक या वेळी उपस्थित होते. नारायण म्हात्रे यांनी आभार मानले.

यांचा झाला सन्मान

पोलीस पथक : उपनिरीक्षक नारायण चव्हाण, हवालदार विनोद चव्हाण, गणेश भोईर, पोलीस नाईक सचिन भोईर, गंगाराम ढुमणे, नितीश पाटील व निलेश कोंढारे, पोलीस शिपाई राम ठाकूर व सत्यवान पिंगळे

वायडर वेस्ट डव्हेंचर पथक : महेश सानप, रोशन सानप, हरेश सानप, पप्पू पवार, वेदांत महाडिक आणि विकास चांद

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply