पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.24) सुनीता एस. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सभेच्या सुरुवातीस ज्ञात-अज्ञात मृत्यू झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रायगड जिल्हा ग्रंथालय संघ अलिबाग संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांचे स्वागत करण्यांत आले. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जोशी यांनी प्रास्ताविक केले. ह्यांत वाचनालया संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले वाचनालयाची वेळ सकाळी 8.30 ते रात्री 8.00 अशी करण्यात आली असून नाममात्र शुल्कदरात अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात रोख देणगी स्वरुपात व पुस्तकाच्या स्वरुपात देणगी देणार्यांचे आभार मानले. सह.कार्यवाह जयश्री शेट्ये यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सन 2021-2022 या करीताचा वार्षिक अहवालाचे वाचन कार्याध्यक्ष विनायक वत्सराज यांनी केले. कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी उत्पन्न खर्च व ताळेबंद पत्रक यांचे वाचन केले. सन 2022-2023मधील अंदाज पत्रकाचे वाचन अॅड. माधुरी थळकर यांनी केले.
संस्थेकरिता तयार करणेत आलेल्या नवीन योजनेच्या प्रगतीची माहिती अध्यक्ष सुनीता जोशी यांनी दिली. सन 2022-2023 करीता लेखापरीक्षकाची नेमणूकीचा ठराव उपाध्यक्ष श्याम वालावलकर ह्यांनी मांडला. कार्यकारीणीचा कार्यकाल संपल्याने निवडणूक अधिकारी मोहन मुझुमदार यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया याच वेळी पर्ण करण्यात आली. सुनीता जोशी यांचे एकमेव पॅनल या ठिकाणी बिनविरोध निवडण्यात्त आले असून अध्यक्षपदाची धुरा सुनीता जोशी यांच्यावर देण्यात आली असून उपाध्यक्ष श्याम शांताराम वालावलकर, कार्याध्यक्ष विनायक नरहर वत्सराज, कार्यवाह काशिनाथ लक्ष्मण जाधव, सहकार्यवाह जयश्री राजेंद्र शेट्ये, कार्यकारीणी सदस्य अॅड. माधुरी राजन थळकर, हिमालिनी गिरीष कुलकर्णी, हेमा दिलीप गद्रे, प्रशांत गजानन राजे, सुनील नथुराम खेडेकर, रमेश धोंडू चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
उपस्थित सभासदांचे आभार मानून वाचनालयाच्या बिल्डिंगसाठीची भविष्यकाळासाठीची तरतूद अगोदरच करुन ठेवण्यात आली असून सभेस उपस्थित सभासदांची त्यासाठी मदत लागेल. माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे यांनी बिल्डिंग फंडासाठी 2500 रुपये देणगी जाहीर करून त्यासाठी पनवेलमधील प्रतिष्ठिताची मदत घेऊ असे सभेपुढे सांगितले. संस्थेच्या अध्यक्ष सुनीता जोशी यांनी या वेळी उपस्थित सभासदाचे आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन हिमालिनी कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रशांत राजे यांनी मानले.