Breaking News

‘सेव युथ, सेव नेशन’साठी ‘रोटरी’ची सायकल रॅली

पनवेल ः प्रतिनिधी

आज तरुण पिढी व्यसनाधिन झाल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. त्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे असल्याने रविवारी (दि. 31) सकाळी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि रनथॉन सायकलिंग ग्रुप न्यू पनवेल यांनी ’सेव युथ, सेव नेशन’साठी एकत्रित येऊन नागरिकांना धूम्रपानाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी सायकल रॅली काढून जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट रोटरिअन श्यामला कुलकर्णी, प्रेसिडेंट इलेक्ट रोटरिअन रवींद्र नाईक, रोटरिअन अविनाश कोळी, रोटरिअन अलका कोळी, सोहम कोळी, मधुकर इन्टेरेक्ट दिव्या मोरे यांचा सहभाग होता, तसेच रनथॉन सायकलिंग ग्रुपप्रमुख  पूर्णसिंह मेहरा, सुभाष सर, श्रीमती देसाई, श्रीमती तेले आणि सर्व सभासदांनी उत्तम साथ दिली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply